अंकिता शहा ह्या इंदापूरच्या नगराध्यक्षा आहेत. त्यानी त्यांचा वाढदिवस हा चक्क इंदापूर शहराच्या कचरा डेपोमध्ये साजरा केला आहे. कचरा डेपोमध्ये काम करणाऱ्या महिला आणि नगरपालिकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पण ज्या कचरा डेपोत त्यांनी हा वाढदिवस साजरा केला त्याचं कारण वेगळं आहे. इंदापूर नगरपालिकेने आणि शहरातील आय कॉलेजने मिळून एक करार केला आहे. यात कॉलेजच्या काही तज्ज्ञ प्राध्यापकांनी कचरा विघटन करणाऱ्या जिवाणूंची निर्मिती अर्थात बायोकल्चर तयार केले आहे.कचरा डेपोवर त्या बायोकल्चरलची फवारणी केल्याने त्याचा दुर्गंध येणं बंद झालं आहे. आता घराघरात कचऱ्या पासून खत निर्मिती होत आहे. पूर्वी कर्मचारी नाका-तोंडाला रुमाल लावून कचरा डेपोत जावं लागत होतं. पण बायोकल्चरल फवारणीमुळे इंदापूरचा कचरा डेपो दुर्गंधीमुक्त झाला आहे. त्यामुळेच नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा केला.यावेळी नगराध्यक्षांच्या हस्ते कचरा डेपोत वृक्षारोपणही करण्यात आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews